Dhurandhar : I am Sorry.. ‘धुरंधर’ पाहून रवीनाचा यामी गौतमला फोन, एकच वाक्य …
Raveena Tandon : आदित्य धरचा धुरंधर हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण त्याचे आकर्षण अजूनही अबाधित आहे. रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना स्टारर चित्रपटाचे कौतुक करणाऱ्यांच्या यादीत आता बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचाही समावेश झाला आहे.

मोहक हसू, नितळ सौंदर्य आणि मनमोहक अदांनी एकेकाळी स्क्रीन गाजवणारी अभिनेत्री रविना टंडन सध्या मोछ्या पडद्यापासून दूर आहे, मात्र असं असलं तरी तिचा जलवा कायम आहे. तिचं फॅन फॉलोईंगही बरंच आहे. रविना टंडन हिने नुकताच आदित्य धरने दिग्दर्शित केलेला रणवीर सिंह याची प्रमुख भूमिका असलेला धुरंधर चित्रपट पाहिला . पण तो पाहताच तिने आदित्य धर याची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतम हिला फोन करून तिची माफी मागितली, तिला थेट Sorry म्हटलं. असं नेमकं काय झालं ?

रवीना टंडन ही अनेकदा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, तिच्या चाहत्यांशी ती कनेक्टेड असते. त्यांच्यासाठी अनेक पोस्ट करते. तसेच ती शो आणि विविध पॉडकास्टमध्येही दिसते.

अलिकडेच एका पॉडकास्ट दरम्यान रविनाने सांगितलं, की नुकताच धुरंधर हा चित्रपट पाहिला.तिला तो खूपच आवडला. चित्रपट पाहून होताच तिने अभिनेत्री यामी गौतम हिला फोन केला.

मी तिला फोन केला आणि म्हटलं आय ॲम सॉरी- यामी. पण मी तुझ्या पतीची खूप मोठी फॅन आहे. तुला माझं म्हणणं, माझा मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचवावा लागेल असं रविनाने सांगितलं. आता तुला माझे अर्धे लक्ष तुझ्या नवऱ्यासोबत वाटावे लागेल, कारण मला वाटते की तो एक उत्तम दिग्दर्शक आहे,असंही ती म्हणाली.

पुढे ती म्हणाली - " मी यामीला सांगितलं की बॉलिवूडमध्ये जे हरवले होतं ते परत आणलंत. आदित्यने चित्रपटसृष्टीत तीच जादू परत आणली आहे जी बऱ्याच काळापासून गायब होती. पुष्पा, केजीएफ आणि आता धुरंधर सारखे चित्रपट पाहून प्रेक्षकांना खरा दिलासा मिळाला आहे, कारण यामध्ये नायक खरोखरच नायकासारखा दिसतो. लोकांना त्यांच्या मातीच्या आणि त्यांच्या देशाच्या समस्यांशी संबंधित कथा पहायच्या असतात, जिथे नायक धमाकेदारपणे गोष्टी व्यवस्थित करतो,असं मी तिला सांगितल्याचं रवीनाने नमूद केलं.

जेव्हा रवीना टंडनला कळलं की रणवीर सिंग तिचा खूप मोठा चाहता आहे, तेव्हा ती जुन्या आठवणींमध्ये हरवून गेली आणि हसत म्हणाली, 'अरे, तो फक्त 10 वर्षांचा मुलगा होता जेव्हा तो माझे एक गाणं पाहण्यासाठी आला होता. धुरंधरमध्ये त्याने उत्तम काम केलं.

पुढे रवीनाने रणवीरचा अभिनय आणि आदित्यच्या दिग्दर्शनाची तारीफ केली. आदित्य धर खरोखरच एक प्रतिभावान दिग्दर्शक आहे, त्याच्यासाठी 'मनाला भिडणारा' हा शब्दही कमी वाटतो, असं रवीनाने सांगितलं,

या पॉडकास्टमध्ये रवीनाने चित्रपटातील संजय दत्त, अक्षय खन्ना, सारा अर्जुन, राकेश बेदी आणि गौरव रेगा इतर कलाकारांचंही, त्यांच्या कामाचं कौतुक केलं.