
अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती तिचे नेहमीच हटके फोटो शेअर करत असते.

शिल्पा शेट्टीनं अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सोबतच ती अनेक कार्यक्रमांची जजसुद्धा होती.

तिनं नवरात्रीच्या मुहूर्तावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिनं तिची मुलगी समिषाची पहिली अष्टमी असल्याचं सांगितलं होतं.

शिल्पानं एक वर्षापूर्वीच मुलीला जन्म दिला, त्यामुळे समिषाची ही पहिली दिवाळीही असणार आहे.

शिल्पा शेट्टीला योगाची आवड आहे. ती सोशल मीडियावर नेहमी योगासंदर्भात फोटो आणि व्हिडीओद्वारे टीप्स देत असते.