विवाहीत असूनही इंटिमेट सीनमध्ये अभिनेत्रीचा ताबा सुटला…; अभिनेत्रीचा हादरुन टाकणारा खुलासा
आजकाल अनेक सीरिज आणि चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स पाहायला मिळतात. पण इंटिमेट सीन्स शूट करणे कलाकारांसाठी आव्हानात्मक असते. नुकताच एका अभिनेत्रीने केलेल्या खुलाशाने मोठी खळबळ माजली आहे.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना शुटिंग करताना अतिशय वाईट अनुभव आला आहे. वेब सीरिज किंवा सिनेमांमध्ये दिसणारे इंटिमेट सीन्स हे सेटवर शूट करणे किती कठीण असते याबाबत अभिनेत्रींनी स्वत: सांगितले आहे. आता एका अभिनेत्रीच्या खुलाशाने मोठी खळबळ माजली आहे.
गँगस्टर ड्रामा चित्रपट मिर्झापूरने अनेकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली आहे. आता या चित्रपटात काम करणाऱ्या सोनल चौहानने मोठा खुलासा केल आहे. तिने सेटवर इंटिमेट सीन शूट करताना आलेल्या अनुभवाविषयी सांगितले आहे.
एका पॉडकास्टमध्ये सोनलला विवाहित अभिनेत्यांसोबत रोमँटिक सीन करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. अनेकदा इंटिमेट सीन शूट करताना अभिनेत्यांचा स्वत:वरचा ताबा सुटतो. अशा वेळी असुरक्षित वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी अभिनेत्रीने दिलेल्या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सोनल उत्तर देत म्हणाली की, मला वाटत नाही की मी अजून इतकी सुरक्षित झाले आहे. पण अनेकदा या गोष्टी फक्त बातम्यांसाठी तयार केल्या जातात. पण जर माझा पार्टनर मला खूप जास्त सुरक्षित वाटायला लागला होता. कदाचित...”
सोनलच्या मते, जर उद्या तिचे लग्न इंडस्ट्रीतीलच एखाद्या हिरोशी झाले आणि एखादी नायिका किस करताना भावनावश झाली... तर कदाचित तिला ते स्वीकारता येणार नाही