
सोनारिका भदोरिया या अभिनेत्रीला आज प्रत्येजकण ओळखतो. इन्स्टाग्रामवर या अभिनेत्रीचे लाखो फॉलोअर्स आहेत.

तिच्या सौंदर्याचे देशभरात चाहते आहेत. तिने आतापर्यंत अनेक मालिका तसेच चित्रपटांत काम केलेले आहे.

सगळे तिला देवों के देव महादेव या मालिकेपासून ओळखतात. तिने या मालिकेत देवी पार्वतीची भूमिका केली होती. 3 डिसेंबर 1992 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला होता.

सोनारिकाने 2011 साली तुम देना साथ मेरा या मालिकेपासून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर 2012-13 मध्ये तिने देवों के देव महादेव या मालिकेत काम केले. या मालिकेनंतर तिला प्रसिद्धी मिळाली.

त्यानंतर तिने काही तेलुगू चित्रपटांत तसेच पृथ्वी वल्लभ, दास्तान ए मोहब्बत सलीम अनारकली, इश्क में मरजावां आदी मालिकांत काम केले.

सोनारिकाने 2015 मध्य तेलुगू सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. तिने जादुगाडू, स्पीडून्नोडू, इदो राकम आदो राकम यासारख्या चित्रपटांत काम केलं.

तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात. तिने 18 फेब्रुवारी 2024 रोजी तिच्या लाँगटाईम बॉयफ्रेंड विकास पराशर याच्यासोबत लग्न केलं.

या दोघांनी एकमेकांना सात वर्षे डेट केलं होतं. त्यानंतर हिंदू विवाह पद्धतीने त्यांनी गेल्या वर्षी लग्न केलं.