Sridevi : पती बोनी कपूर नव्हे, 13 वर्षांनी मोठ्या सुपरस्टारच्या प्रेमात होती श्रीदेवी, 7 दिवसांचा उपास आणि… नाव ऐकताच..

Bollywood Queen Sridevi Took Fast: बॉलीवूडमध्ये स्टार्सच्या प्रेमाचे किस्से, कहाण्या अनेकदा ऐकायला मिळतात. कधीकधी काही स्टार्स हे जात पात, धर्म , वय न पाहता प्रेमात पडतात, इंडस्ट्रीत असे अनेक किस्से ऐकायला मिळतात, जिथे प्रेमात असलेल्या स्टार्सच्या वयात खूप अंतर असल्याचंही दिसलं. आज अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणऊन घेणार आहोत, जी तिच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली. पण..

| Updated on: Feb 24, 2026 | 12:12 PM
1 / 6
बॉलीवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिने तिच्या अभिनयाने आणि अदांनी सर्वांची मनं जिंकली आणि इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. तिने अनेक दशकांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. श्रीदेवीने फक्त हिदींच नव्हे तर तमिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करून जगभरातील लोकांच्या हृदयावर राज्य केलं. पण चित्रपटांसोबतच श्रीदेवी ही वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत होती. ( Photos - Getty Images)

2 / 6
13 ऑगस्ट 1963 साली तामिळनाडूतील मीनमपट्टी या छोट्याशा गावात श्रीदेवीचा जन्म झाला. तिच्या वडिलांचे नाव अय्यपन आणि आईचे नाव राजेश्वरी होते. श्रीदेवीने वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षापासून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर अनेक वर्षांनी तिने , 1979 साली हिंदी चित्रपटसृष्टीत  प्रवेश केला. "सोलवा सावन" हा पहिला चित्रपट होता,  पण "हिम्मतवाला" चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली

3 / 6
बॉलिवूडमध्ये, श्रीदेवीने मिथुन आणि जितेंद्र यांच्यासोबत अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले. या दोन्ही स्टार्ससोबत तिचं नाव खूपदा जोडलं गेलं. पण या दोघांच्या आधीही श्रीदेवीचे नाव दुसऱ्या एका स्टारशी जोडलं गेलं होतं. आणि त्यांच्या केमिस्ट्रीने लोकांच्या हृदयात घर केलं होतं. तो सुपरस्टार म्हणजे रजनीकांत..

4 / 6
 मोठ्या पडद्यावर रजनीकांत आणि श्रीदेवीचीजोडी लोकांना खूप आवडायची. त्या दोघांनी मिळून अनेक चित्रपटांत कामही केलं. त्यादरम्यान त्यांच्याच चांगली केमिस्ट्री निर्माण झाली. दोघांमध्ये अनेक दशके एक खोल नातं होतं. रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत हे हळूहळू श्रीदेवीच्या प्रेमात पडले. पण दोघांच्या वयात 13 वर्षांचा फरक होता. श्रीदेवी त्यांच्यापेक्षा लहान असूनही, रजनीकांत यांना तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती.

5 / 6
दिवंगत चित्रपट निर्माते बालचंदर यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता की,  रजनीकांत यांनी श्रीदेवीला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीदेवीच्या हाऊसवॉर्मिंग समारंभासाठी रजीनकांत तिच्या घरी गेले, तेव्हा ते तिला प्रपोज करणार होते, पण अचानक वीज गेली. रजीनकांत यांना तो अपशकुन वाटला आणि त्यांनी त्यांचा विचार बदलला, ते तिथून निघून गेले. त्यानंतर बऱ्याच काळाने श्रीदेवी हिने निर्माता बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं.

6 / 6
2011 साली रजनीकांत यांची तब्येत खूप बिघडली होती, त्यांना उपचारांसाठी सिंगापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा श्रीदेवी हिने शिर्डीच्या साईबाबांची पूजा करण्यास सुरुवात केली आणि सात दिवस उपासही केला होता. रजनीकांत यांना लवकर बरं वाटावं यासाठी तिने पुण्यातील साईबाबांच्या मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं होतं.  स्वतः  रजनीकांत यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला होता. श्रीदेवी आता या जगात नाहीत. आजच्याच दिवशी, 8 वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2018 साली वयाच्या 54 व्या वर्षी दुबईमध्ये तिचं निधन झाले. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे.)