क्यूट..क्यूट, इतकी सुंदर की सर्वजण करत आहेत सौंदर्याचं कौतुक, कोण आहे ही अभिनेत्री?

‘विसरू नको तू मला’ फेम मराठी अभिनेत्री तन्वी मुंडलेचा निळ्या आणि गुलाबी रंगाच्या पारंपरिक साडीमधील लूक पाहून चाहते घायाळ. साडीमधील अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून सर्वजण करत आहेत कौतुक.

| Updated on: Sep 08, 2026 | 6:26 PM
1 / 5
लोकप्रिय मालिका ‘विसरू नको तू मला’मधून अभिनेत्री तन्वी मुंडले सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. आपल्या अभिनयासोबतच तन्वी तिच्या स्टायलिश आणि आकर्षक लूकमुळेही सोशल मीडियावर चर्चेत असते.

लोकप्रिय मालिका ‘विसरू नको तू मला’मधून अभिनेत्री तन्वी मुंडले सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. आपल्या अभिनयासोबतच तन्वी तिच्या स्टायलिश आणि आकर्षक लूकमुळेही सोशल मीडियावर चर्चेत असते.

2 / 5

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले असून, या फोटोंमध्ये तिचा पारंपरिक अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

3 / 5

या खास फोटोशूटसाठी तन्वीने निळ्या आणि गुलाबी रंगाच्या कॉम्बिनेशनची सुंदर रेशमी साडी नेसली आहे. या साडीला तिने मॅचिंग असा गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस डीप-नेक ब्लाऊज परिधान केला आहे.

4 / 5

पारंपरिक साडीला मॉडर्न ब्लाऊजची जोड देत तिने आपला लूक अगदी एलिगंट आणि ग्लॅमरस ठेवला आहे. तन्वीने या लूकवर गळ्यात हेवी डिझायनर चोकर हार घातला असून या दागिन्यामुळे तिच्या पारंपरिक सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

5 / 5

कपाळावरची छोटीशी काळी टिकली आणि मोकळे सोडलेले कुरळे केस तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहेत. फोटोशूटदरम्यान तन्वीने खिडकीजवळ उभं राहून दिलेल्या विविध पोज चाहत्यांना विशेष भावल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us