
अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवलाय. मात्र, त्यांचे खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिलेले आहे. त्या बिग बॉस मराठीही सहभागी झाल्या होत्या.

वर्षा उसगांवकर यांच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, त्यांना एकही मुलबाळ नाहीये. याबद्दल काही दिवसांपूर्वीच त्या बोलताना दिसल्या.

हेच नाही तर सासरे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रविशंकर शर्मा यांनी देखील वर्षा उसगांवकर आणि पती अजय शर्मा यांना त्यांच्या संपत्तीतून बेदखल केले होते.

ही केस बरीच वर्ष कोर्टात सुरू होती. त्यांनी सून वर्षा उसगांवकर आणि मुलावर गंभीर आरोप करत त्यांना संपत्तीतून बाहेरचा रस्ता दाखवला.

कोणत्याही प्रकारची माझी काळजी घेतली नाही आणि जबाबदारी घेतली नसल्याने माझी सर्ष संपत्ती दोन्ही मुलींच्या नावावर जावी, असे सासऱ्यांनी म्हटले होते.