
Adani Power Shares: नवीन वर्षात अदानी पॉवरच्या शेअरने मोठी झेप घेतली. गुरुवारी 1 जानेवारी रोजी या शेअरमध्ये 7.1 टक्क्यांची उसळी दिसील. यासह शेअर्सच्या किंमती 153.20 रुपयांवर पोहचल्या. तर आज शुक्रवारी या शेअरमध्ये घसरण दिसली. आज हा शेअर 148.15 वर आला. पण हा शेअर मोठी भरारी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या शेअरमध्ये उसळीची अनेक कारणं आहेत. कंपनीची जोरदार घोडदौड सुरू आहे. वीजेची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांना चांगलं भविष्य असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भविष्यात सौरऊर्जेसह इतर अक्षय ऊर्जा प्रकल्पाची गरज वाढली आहे. अशा कंपन्याना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

एंटीक स्टॉक ब्रोकिंगनुसार, अदानी पॉवर मल्टि ईअर अर्निंग्स अपसायकलमध्ये लवकरच प्रवेश करेल. आर्थिक वर्ष 2025 मध्ये 18.15 GW ते FY33 मध्ये त्याची क्षमता 2.3 पटीत वाढ होण्याची शक्यता आहे. ट्रेंडलाईन डेटानुसार, काल दुपारी 12:45 वाजेपर्यंत NSE आणि BSE दोन्हीवर जवळपास 50 दशलक्ष शेअर्सची देवाणघेवाण झाली.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अदानी पॉवरच्या शेअरमध्येच तेजी आली नाही, तर या समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर वधारले. काही कंपन्यांच्या शेअरमध्ये तर 9 टक्क्यांची तेजी दिसली. सुरवातीच्या दिवशी अदानी समूहातील सर्व सूचीबद्ध कंपन्या हिरवाईत न्हाऊन निघाल्या.

अदानी टोटल गॅस लिमिटेडचा शेअर सर्वात आघाडीवर होती. गुरुवारी हा शेअर 9.45 टक्क्यांहून अधिकने उसळून तो 620.65 रुपयांवर पोहचला. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि अदानी एनर्जी सॉल्यूशन्स लिमिटेड या दोन्ही शेअरमध्ये 3 टक्क्यांची वाढ दिसली. या दोन्ही मार्केट कॅपिटलायझेशन क्रमशः 1.3 लाख कोटी आणि 1.7 लाख कोटी रुपयांवर पोहचला.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.