Viral Infection दूर ठेवण्यासाठी गुणकारी ठरतात हे पदार्थ

ऋतूमानानुसार व्हायरल इनफेक्शनमुळे घसा खवखवणे, सर्दी-खोकला, ताप येणे आणि घसा दुखणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीमध्ये काही मसाल्यांचे सेवन केल्याने बदलत्या मोसमामुळे होणारे व्हायरल इनफेक्शन दूर ठेवण्यास मदत मिळते.

| Updated on: Jan 23, 2023 | 8:30 AM
1 / 5
बदलत्या ऋतूमध्ये व्हायरल इनफेक्शनमुळे संसर्गामुळे अनेकांना त्रास होतो. सर्दी-खोकला, ताप येणे आणि घसा दुखणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे व्यक्ती हैराण होतात. अशा परिस्थितीमध्ये काही मसाल्यांचे सेवन केल्याने तुम्ही व्हायरल इन्फेक्शनपासून स्वतःला वाचवू शकता. हे मसाले कोणते आहेत ते जाणून घेऊया.

2 / 5
ओवा - ओव्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात.  ते घसा खवखवणे आणि सर्दी दूर ठेवण्यास मदत करतात. ओव्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील मुबलक प्रमाणात असतात.

3 / 5
काळी मिरी - काळ्या मिरीमध्ये व्हिटॅमिन सी असते. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. काळी मिरी खाल्ल्याने सर्दी आणि फ्लू टाळण्यास मदत होते. तुम्ही काळी मिरी मधात मिसळून खाऊ शकता.

4 / 5
दालचिनी - दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. यामध्ये अँटी व्हायरल, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात, जे सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी मदत करतात.

5 / 5
आलं - सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी तुम्ही मधासोबत आल्याचे सेवन करू शकता. आल्याच्या सेवनाने पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत होते. शिवाय पोट फुगण्याच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो.