Ramayana : तब्बल 27 देशांत आदिनाथ कोठारेचा ‘रामायण’ सुपरहिट! चीन, जपान आणि रशियात रिलीज होण्याआधीच…
Ramayana : अभिनेता रणबीर कपूर, आदिनाथ कोठारे स्टारर 'रामायण' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडताना दिसत आहे. तब्बल २७ देशांमध्ये सिनेमाने उत्तम कामगिरी केली आहे. तर चीन, जपान आणि रशियात रिलीज होण्याआधीच मोठा विक्रम रचला आहे... तर जाणून घ्या सिनेमाच्या कमाईबद्दल

अभिनेता रणबीर कपूर, आदिनाथ कोठारे स्टारर 'रामायण' सिनेमाने प्रदर्शनाच्या अवघ्या २३ दिवसांत जगभरात ऐतिहासिक कमाई करत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. सिनेमाने 23 दिवसांत भारतात १,१९५ कोटींचे एकूण कलेक्शन केले आहे. परदेशात देखील सिनेमाची चर्चा सुरु आहे.
परदेशातील कमाईबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाची कमाई ५९५ कोटींवर पोहोचली आहे. एकत्रितपणे सिमेमाचं जागतिक कलेक्शन १,७९० कोटी झाले आहे. 'रामायण' चित्रपट जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे, यातील २७ देशांमध्ये या सिनेमाने 'सुपरहिट' होण्याचा मान मिळवला आहे.
अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, थायलंड, इंडोनेशिया आणि नेपाळ यांसारख्या महत्त्वाच्या देशांमध्ये 'रामायण' हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा ठरला आहे.
तर सिनेमा नव्या देशांमध्येही ऐतिहासिक कामगिरी करत आहे. स्लोव्हाकिया, युक्रेन, लाटविया, जॉर्जिया, आर्मेनिया, कंबोडिया, व्हिएतनाम, घाना आणि केनिया यांसारख्या नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही या सिनेमाने सर्वाधिक कमाईचा विक्रम रचला आहे.
विशेष म्हणजे, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये हा सिनेमा अद्याप प्रदर्शित झालेला नाही. तिथे प्रदर्शित झाल्यावर कमाईचे आकडे आणखी मोठे विक्रम मोडण्याची दाट शक्यता आहे.. असं देखील सांगितलं जात आहे.