आदिनाथ कोठारेची मालिका विश्वात दमदार एण्ट्री; साकारणार ‘ही’ रुबाबदार भूमिका

'नशिबवान' ही मालिका येत्या 15 सप्टेंबरपासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सोनाली खरे, अजय पूरकर यांच्याही भूमिका आहेत. या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे.

| Updated on: Aug 25, 2025 | 10:29 AM
1 / 5
प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आदिनाथ कोठारेला प्रेक्षकांनी अनेक चित्रपट आणि वेब सीरिजच्या माध्यमातून पडद्यावर पाहिलंय. आदिनाथ आता मालिकाविश्वात दमदार एण्ट्री घेण्यासाठी सज्ज झाला आहे. स्टार प्रवाहच्या 'नशिबवान' मालिकेतून रुद्रप्रताप घोरपडेच्या रुपात आदिनाथ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

2 / 5
रुद्रप्रताप घोरपडे हा नागेश्वर घोरपडेचा एकुलता एक मुलगा. दिसायला रुबाबदार.. जणू एखादा राजकुमार. स्वभावाने मनमिळाऊ. सर्वांची मदत करणारा रुद्रप्रताप नागेश्वरच्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध आहे.

3 / 5
वडिलांचा मोठा बिझनेस असल्याने रुद्रला परदेशी पाठवण्याची त्याच्या वडिलांची म्हणजेच नागेश्वरची इच्छा होती. पण रुद्रने गावात राहून गावातल्या लोकांच्या मदतीसाठी आणि सेवेसाठी आपलं आयुष्य वाहून घेण्याचा निर्णय घेतला.

4 / 5
या भूमिकेविषयी सांगताना आदिनाथ म्हणाला, "या मालिकेसाठी मी प्रचंड उत्सुक आहे. ही माझी पहिली दैनंदिन मालिका आहे. गेली अनेक वर्षे मालिका करण्याचा विचार सुरु होता. 'नशिबवान' मालिकेच्या निमित्तानेच हा योग जुळून आला. टीव्ही हे फक्त माझंच नाही तर प्रत्येकाचच आवडतं माध्यम आहे. मालिकेच्या माध्यमातून तुम्ही घराघरात पोहोचता, प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग होता."

5 / 5
"नशिबवान मालिकेची गोष्ट अतिशय सुंदररित्या गुंफण्यात आली आहे. रुद्रप्रताप या भूमिकेला देखिल अनेक पदर आहेत. जे हळूहळू उलगडतील. या मालिकेत दिग्गज कलाकारांची फौज आहे. गणेशोत्सवाच्या धामधुमीत अतिशय छान कलाकृती माझ्या वाट्याला आली आहे," अशा शब्दांत त्याने आनंद व्यक्त केला.