Dhurandhar 2 : जमील जमालीचे ते दिवस खूप वाईट होते, केळी खाऊन दिवस काढणारा हा माणूस आज इतक्या कोटीच्या संपत्तीचा मालक
Dhurandhar 2 : रणवीर सिंहच्या धुरंधर 2 ची बॉक्स ऑफिसवर सध्या धूम आहे. सगळीकडे या चित्रपटाचं कौतुक सुरु आहे. लवकरच हा चित्रपट भारतात 1000 कोटींचा व्यवसाय करण्याच्या जवळपास पोहोचेल. आदित्य धरसाठी ही चांगली बाब आहे. कारण त्याचे दोन बॅक टू बॅक चित्रपट 1000 कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहेत.

आदित्य धरने धुरंधर 2 साठी जो क्लायमॅक्स ठरवलेला तो जबरदस्त आहे. अखेरपर्यंत प्रेक्षकांसाठी हमजा म्हणजे जसकीरत सिंह रंगी हिरो होता. पण शेवटच्या क्षणी जमील जमालीने कमाल केली. राकेश बेदी भारतीय हेर निघतात. हा सीन खूप कमाल होता. या सीनला थिएटरमध्ये खूप टाळ्या, शिट्टया वाजल्या.

राकेश बेदी यांचा एक किस्सा खूप चर्चिला जातो. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांच्याकडे काम नव्हतं. अभिनेत्याकडे खाण्याचेही पैसे उरले नव्हते. 1 रुपये इतकाच बँक बॅलन्स शिल्लक उरला होता.

राकेश बेदी यांनी फिल्म इंस्टीट्यूटमध्ये शिक्षण घेतलय. त्यांनी कधी कुटुंबाकडे पैसे मागितले नाहीत. कारण कुटुंबाकडेच पैसे नव्हते. आईला कधी बोललो नाही, कारण तिला वाईट वाटेल. त्यावेळी एक रुपयात 6 केळी मिळायची.

ती 1 रुपयात मिळणारी केळी खाऊन राकेश बेदी यांनी दिवस काढलेत. मित्रांकडून पैसे उधार घेतले. रिपोर्टनुसार धुरंधरसाठी राकेश बेदी यांना 70 लाख ते 1 कोटी दरम्यान मानधन मिळालं आहे.

राकेश बेदी यांचं इंडियन सिनेमामध्ये मोठ करिअर आहे. अनेक टीव्ही मालिका, 150 पेक्षा जास्त चित्रपचट, मिडिया रिपोर्ट्सनुसार राकेश बेदी यांची अंदाजित संपत्ती जवळपास 65 ते 70 कोटीच्या घरात आहे.