
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा अखेर पाड पडला आहे.

या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी अयोध्येतल्या विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.

तसेच या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी संध्याकाळच्या सुमारास शरयू तिरावर आरतीही केली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आली होती.

शिवसेनेचे अनेक बडे नेते एक दिवस आधीच अयोध्येत दाखल होत तयारीचा आढावा घेताना दिसून आले.

या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी अनेक साधू संत आणि महंतांच्या भेटीगाठीही घेतल्या.

तसेच आदित्य ठाकरे यांना या दौऱ्यात अनेक देवतांच्या प्रतिमा आणि ग्रंथ ही देण्यात आले.

दिवसभराचा अयोध्या दौरा संपवून आदित्य ठाकरे मुंबईत परतले आहेत.