अचानक जंगलातून आदिवासी बाहेर, कित्येक वर्षांपासून जंगलात वास्तव्यास, बाहेर येऊन थेट मागितली ही वस्तू..
जंगलातून एकाच वेळी काही आदिवाशी बाहेर पडल्याने सर्वजण अचंबित झाले. कोणालाही काहीही कळत नव्हते. अनेक वर्ष जंगलात राहणारे आदिवाशी बाहेर पाहून कोणाला काय करावे, हेच सुचत नव्हते. बाह्य जगाशी त्यांचा काहीच संबंध नव्हता.

तब्बल काही वर्षानंतर आदिवासी जंगलातून बाहेर आले. अनेक पिढ्यांपासून जंगलात राहणारे अदिवासी मानवी वस्तीपर्यंत पोहोचल्याने सर्वजण हैराण झाले. ब्राझीलच्या अमेझॉनच्या जंगलात राहणारे अदिवासी 20 सदस्य अचानक गावांपर्यंत पोहोचले.
कित्येक वर्ष ही जमात बाद्य जगापासून वेगळे जीवन जगत होती.आवे जमातीमध्ये 20 जण जंगलातून बाहेर आले. सर्वायव्हल इंटरनॅशनलच्या माहितीनुसार, 20 लोक बाहेर आले, त्यापैकी काही लहान मुले होते तर काही वयस्कर होतील, त्यापैकी अनेकजण कुपोषित दिसत होती.
बाहेर येऊन त्यांनी याम म्हणजेच कंदमूळ पीक मागितले. लोकांनी त्यांना खाण्यापिण्यासही दिले. आवे जमात ही आजही जंगलात राहते. शिकार, अन्नसंकलन आणि पारंवारिक जीवनशैलवर अवलंबून आहे. मात्र, त्यांना जंगल सोडून बाहेर यावे लागले.
त्यातील काही अदिवासी गंभीर आजारानेही त्रस्त दिसले. हे आदिवासी बाहेर कधीच जंगलातून पडले नव्हते. बाहेरील लोकांशी ते संपर्क देखील ठेवत नव्हते. आदिवाशी लोकांनी आवे जंगल सोडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
बाहेरील लोकांच्या संपर्कात आल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.अशावेळी बाहेरील लोकांसोबत संपर्कही घातक होऊ शकतो. बेकायदा वृक्षतोड, शिकार यामुळे जंगलात गंभीर समस्या निर्माण होत आहेत.