
अन्नाची चव वाढवणारा मसाले पदार्थ हिरवी वेलची केवळ तोंडाची दुर्गांधी दूर करत नाही तर, पोटातील एंजाइम देखील सक्रिय करते. जेवल्यानंतर हिरली वेलची तोंडात ठेवणे अत्यंत फायदेशीर आहे.

लवंगमध्ये युजेनॉल नावाचे एक रसायन असते, जे अँटीसेप्टिक गुणधर्मांनी समृद्ध असते. दात आणि हिरड्यांवर देखील लवंग उपयोगी आहे. त्यामुळे लवंग देखील तुम्ही जेवल्यानंतर खाऊ शकता.

पुदिन्याची पाने देखील तुम्ही जेवल्यानंतर खाऊ शकता. तोंडाच्या आरोद्यासाठी पुदिन्याचे पाने लाभदायक आहेत. रात्रीच्या जेवणानंतर 2 - 3 पुदिन्याची पाने तोंडात ठेवल्याने दुर्गंधी दूर होते. अॅसिडिटीचा त्रास असलेल्यांनी तज्ज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय पुदिन्याची पानं खाऊ नये.

जेवल्यानंतर तुम्ही जिरे आणि ओवा देखील खाऊ शकता. जेवल्यानंतर जिरे आणि ओवा खाल्ल्याने पचन सुधारते, पोटफुगी आणि गॅस कमी होतो, आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

जेवल्यानंतर धणे पाणी पिणे हे पचन सुधारते आणि अॅसिडिटी कमी करते, तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. यात असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्समुळे पचनक्रिया सुरळीत होते, पोट फुगण्याची समस्या कमी होते आणि शरीराला थंडावा मिळतो.