Karisma Kapoor : तो मुलगा करिश्मा कपूरच्या अंगावर पडला, त्यावरुन बॉलिवूडमधली एक हिट जोडी तुटली ती कायमचीच

Karisma Kapoor : प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर आणि नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी अनेक चित्रपटांसाठी एकत्र काम केलं. त्यांनी केलेली गाणी हिट ठरली. चित्रपट कृष्णामधील सुपरहिट गाणं झांझरिया त्यासाठी करिश्मा कपूरच भरपूर कौतुक झालं. ते गाण सरोज खान यांनी करिश्मासाठी कोरियोग्राफ केलं होतं.

| Updated on: May 20, 2026 | 8:08 AM
1 / 5
  90 च्या दशकातला हिट चित्रपट 'दिल तो पागल हैं' सेटवर त्या दोघींमध्ये एक गोष्टीवरुन वाद झाला. एक छोटासा अपघात झाला. त्यावरुन दोघींमध्ये बिनसलं ते कायमचचं. सरोज खानच्या असिस्टेंट कोरियोग्राफरने अलीकडेच एका मुलाखतीत या वादाबद्दल सांगितलं.

90 च्या दशकातला हिट चित्रपट 'दिल तो पागल हैं' सेटवर त्या दोघींमध्ये एक गोष्टीवरुन वाद झाला. एक छोटासा अपघात झाला. त्यावरुन दोघींमध्ये बिनसलं ते कायमचचं. सरोज खानच्या असिस्टेंट कोरियोग्राफरने अलीकडेच एका मुलाखतीत या वादाबद्दल सांगितलं.

2 / 5

'बॉलीवुड ठिकाना' ला दिलेल्या मुलाखतीत रुबीना यांनी करिश्मा आणि सरोज खान यांच्याशी संबंधित सेटवरची एक घटना सांगितली. करिश्मा कपूर आणि सरोज खान 'दिल तो पागल हैं' चित्रपटातील गाण्यावर शूटिंग करत होते. त्या गाण्यात एक सीन होता. त्यात अभिनेत्रीला पळत जाऊन एक जागेवर थांबायचं असतं.

3 / 5

सेटवर एक झाडं होतं. सीन असा होता की, काही मुलं आणि मुली त्या झाडावर लपलेले असतात. सीन शूट होत असताना झाडाची एक फांदी तुटली आणि लपलेला मुलगा खाली उभ्या असलेल्या करिश्मा कपूरच्य अंगावर पडला. त्यात करिश्माला थोडं लागलं.

4 / 5

करिश्मा चिडली. करिश्मा त्या मुलावर ओरडली. त्याल बरच काही सुनावलं. मूर्ख म्हणाली. सरोज खान यांना करिश्माचं हे वर्तन अजिबात आवडलं नाही. सरोज खान यांनी नेहमीच आपल्या टीमला जपलं आहे. त्या प्रोटेक्टिव होत्या.

5 / 5

सरोज खान मध्ये पडल्या. करिश्माला सांगितलं तुझं हे वागणं योग्य नाही. त्या मुलाने जाणून-बुजून असं केलेलं नाही. त्याने माफी सुद्धा मागितली आहे. करिश्माने शूटिंग करणार नाही अशी भूमिका घेतली. ती तिथून निघून गेली. त्यानंतर सरोज खान आणि करिश्मा कपूर यांनी कधीच एकत्र काम केलं नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us