
अभिनेत्री तारा सुतारिया ही गेल्या अनेक काही वर्षांपासून करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांचा भाऊ आदर जैन याच्यासोबत रिलेशनमध्ये होती. बऱ्याच वर्षांनंतर आता यांचे ब्रेकअप झाले आहे.

तारा सुतारिया हिच्यासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर आता आदर जैन हा कोट्यावधी संपत्ती असलेल्या मुलीच्या प्रेमात पडलाय आणि तिच्यासोबतच लग्न करणार आहे.

आदर जैन याने लग्नासाठी गर्लफ्रेंडला प्रपोज केला असून याचे काही फोटोही व्हायरल होत आहेत. आदर जैन याच्या गर्लफ्रेंडचे नाव अलेखा आडवाणी असून ती एक बिझनेस वुमन आहे.

इंस्टा स्टोरीवर तारा हिने शेअर केलेली ही पोस्ट आदर जैन याच्यासाठीच असल्याचा अंदाजा लावला जातोय. हेच नाही तर त्या पोस्टचे स्क्रिन शॉटही व्हायरल होत आहेत.

काही दिवसांपूर्वीच आदर जैन याने अलेखा आडवाणी हिच्यासोबतचे अत्यंत खास फोटो शेअर केले. यामध्येच आता एक्स गर्लफेंड तारा सुतारिया हिची एक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे.