
हेमा मालिनी या आता तिसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या मथुरामधून त्या तिसऱ्यांदा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे हेमा मालिनी यांची ही सीट मोठ्या लीडने आलीये.

हेमा मालिनी यांच्या विजयानंतर मुलगी ईशा देओल हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आई हेमा मालिनी हिला शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय एक खास फोटोही शेअर केलाय.

मुलगी ईशा हिने जरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आईला शुभेच्छा दिल्या असतील तरीही अभिनेते आणि पती धर्मेंद्र यांनी मात्र, हेमा मालिनी यांना शुभेच्छा देणारी कोणतीही पोस्ट शेअर केली नाही.

फक्त धर्मेंद्र हेच नाही तर सावत्र मुले बॉबी देओल आणि सनी देओल यांनी देखील हेमा मालिनी यांना शुभेच्छा दिल्या नाहीत. यामुळे चर्चा रंगलीये.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल हिचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झालाय. ईशा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे.