
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी विवाहबंधनात अडकणार आहेत. हा विवाह आता गोव्यात होणार आहे. या जोडप्याने आधी परदेशात डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं ठरवलं होतं. पण त्यानंतर आता त्यांनी देशातच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना भारतातच लग्न समारंभ आयोजित करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला आहे.

सहा महिन्यांने आधीच त्यांनी लग्नाची तयारी केली होती. पण पीएम मोदींच्या आवाहनानंतर त्यांनी हा निर्णय बदलला.

पीएम मोदींच्या आवाहनानंतर या जोडप्याने देशाप्रती असलेले प्रेम आणि वाढत्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्याच्या त्यांच्या इच्छेमुळे हा निर्णय घेतला आहे.

दोघेही जबाबदार नागरिक या नात्याने ते केवळ त्यांचा विवाह करणार नाहीत तर राष्ट्राप्रती त्यांचे कर्तव्यही पार पाडतील.

गेल्या वर्षी रकुल छत्रीवाला आणि आय लव्ह यू या चित्रपटात दिसली होती. 2024 मध्ये ती मेरी पटनी का रिमेक आणि इंडियन 2 सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. चाहते दोन्ही चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.