Santosh Deshmukh Case : ‘माझ्या दादाला लय जपत होतो मी..’, धनंजय देशमुख यांच्या भावनांचा बांध फुटला, मन्न सुन्न करणारे Photos

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आज मनोज जरांगे पाटील धनंजय देशमुख यांना भेटायला गेले. त्यावेळच तिथलं दुश्य मन सुन्न करणारं होतं. जरांगे पाटील यांना समोर पाहून धनंजय देशमुख यांच्या भावनांचा बांध फुटला. माणूस म्हणून अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा हा प्रसंग होता.

| Updated on: Mar 04, 2025 | 12:57 PM
1 / 5
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी किती क्रूरतेने, निदर्यतेने त्यांची हत्या केली, त्याचे फोटो आता व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर सगळ्यांच्या मनात संताप, चीड अशा भावना आहेत.

2 / 5
हे फोटो समोर आल्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग येथे जाऊन धनंजय देशमुख यांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुख यांच्या भावनांचा बांध फुटला. ते मनोज जरांगे पाटील यांना मिठी मारुन रडले.

3 / 5
"माझ्या दादाला लय जपत होतो मी. मला दु:ख सहन होत नाहीय. घरी जायची मला हिम्मत होत नाहीय" असं धनंजय देशमुख मनोज जरांगे पाटील यांच्याजवळ बोलले. त्यावेळी जरांगे पाटील त्यांचं सांत्वन करण्याचा, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते.

4 / 5
मनोज जरांगे पाटील यांनी आज धनंजय देशमुख यांना भेटून त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वातावरण खूप भावनात्कम झालेलं. समोर स्वर्गीय संतोष देशमुख यांचा फोटो होता.

5 / 5
"जबाबदारी आपली आहे. टोकाच बोलतोय मी. आपल्या हातात तेवढी एकच गोष्ट आहे, संतोष भय्याच्या मृत्यूचा बदला घेणं. त्यांना सुटून येऊ द्या जसं यायच तसं.  भयंकर कृत्य आहे. इतका राग येण्यासाठी सारखी चूक नाही" असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.