
टीम इंडियाचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिक,हे दोघे विभक्त झाल्यावरही चर्चेत आहेत. लग्नाच्या चार वर्षानंतर त्यांनी अखेर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना बऱ्याच ट्रोलिंगचाही सामना करावा लागला, तर काहींनी त्यांना सपोर्टही केला. सध्या नताशा मायदेशी परतली असून तेथे ती तिच्या मुलासोबत वेळ घालवत आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर ती अनेक फोटोही शेअर करत असते. ( फोटो : Instagram )

अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तिने बिकिनी घातलेली ती. तिने सोशल मीडियावर तिची फिगर फ्लाँट केली.

सोशल मीडियावर नताशाचे फोटो पाहून चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. नताशा ही तिचा मुलगा अगस्त्य आणि मित्रासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे.

नताशा आणि हार्दिक पांड्या यांनी काही महिन्यांपूर्वीच विभक्त झाल्याची घोषणा केली होती. नताशाने पहिल्यांदा ही बातमी तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आणि काही क्षणांनंतर हार्दिकनेही वेगळं होत असल्याची घोषणा केली.

2020 साली नताशा आणि हार्दिकचे लग्न झाले आणि दोन महिन्यांनंतर त्यांच्या मुलाचा, अगस्त्याचा जन्म झाला. या जोडप्याने 2023 मध्ये पुन्हा थाटामाटात लग्न केले.

हार्दिक आणि नताशाचे लग्न चार वर्षांनंतर तुटलं. सध्या अगस्त्य त्याची आई नताशासोबत सर्बियामध्ये आहे. हार्दिक आणि नताशा यांनी त्यांचा मुलगा अगस्त्यचे को-पॅरेंटिंग ( सहपालकत्व) करण्याचा निर्णय घेतला आहे.