
सोलापुरातील वडवळ गावात मालकाच्या मृत्यूनंतर त्यांचा कुत्रा स्मशानभूमीतच ठाण मांडून बसल्याचे पाहायला मिळत आहे. या कुत्र्याची संध्या पूर्ण गावात चर्चा आहे.

सांगायचं झालं तर, वडवळ गावातील तानाजी पवार या शेतकऱ्याचा दहा दिवसांपूर्वी मृत्यू झाला. मालकाच्या मृत्यूनंतर देखील कुत्र्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. फोटोंमध्ये तुम्ही कुत्र्याची अवस्था पाहू शकता.

कुत्रा स्मशानभूमीच सर्वत्र फिरताना दिसत आहे. दिवस रात्र कुत्रा स्मशानभूमीत राहत आहे. सध्या सर्वत्र कुत्र्याची चर्चा सुरु आहे. आपला परत येईल आणि आपल्याला जवळ घेईल असंच त्या कुत्र्याच्या मनात असाव...

तानाजी पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर वडवळ गावातील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र मागील दहा दिवसांपासून मृत शेतकऱ्याने पाळलेला कुत्रा आपल्या मालकाच्या अंत्यसंस्कार केलेल्या स्मशानभूमीतच बसून आहे

त्यामुळे सर्वात प्रामाणिक प्राणी म्हणजे कुत्रा हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मोहोळ तालुक्यातील वडवळ गावात ही घटना घडली आहे. या घटनेची चर्चा सोलापुरात चांगलीच रंगली आहे.