IND vs SA : वर्ल्ड कप आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वॉर्म अप मॅच जिंकलो, पण या विजयातही टीम इंडियाचे मायनस पॉइंट काय?
IND vs SA : टी 20 वर्ल्ड कप दोन दिवसांवर आला आहे. भारताने आधी न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीज 4-1 अशी जिंकली. काल दक्षिण आफ्रिकेला हरवलं. पण म्हणून सगळे प्रश्न सुटलेले नाहीत. टीम इंडियाच्या कालच्या विजयातही काही टेन्शन वाढवणारे मायनस पॉइंट आहेत.

टीम इंडिया काल वर्ल्ड कपच्या वॉर्म अप मॅचमध्ये खेळली. वॉर्म अप मॅच म्हणजे प्रत्यक्ष वर्ल्ड कपला सुरुवात होण्याआधीच सराव सामना. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सराव सामन्यात टीम इंडियाने 30 धावांनी सहज विजय मिळवला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये पाच बाद 240 धावांचा डोंगर उभारला. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 210 धावा केल्या. या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली.

मॅच जिंकलो असलो,तरी काही धोके अजूनही कायम आहेत. सर्वप्रथम आपण टीम इंडियाच्या प्लस साइड जमेच्या बाजू आहेत, त्या पाहू. इशान किशनच्या 20 चेंडूत (53) धावा, तिलक वर्माच्या 19 चेंडूत (45) रन्स, सूर्यकुमार यादव (30), अक्षर पटेल (35) धावा. टीमच्या फलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली.

आता मायनस साइड पहा. टीम इंडियाने 240 धावांचा डोंगर उभा केला. पण दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 200 धावांचा टप्पा ओलांडला. याचा अर्थ आपली गोलंदाजी तितकी तगडी नाहीय. आपण त्यांना 160-170 धावासंख्येपर्यंत रोखायला हवं होतं.

हार्दिक पंड्याने 2 ओव्हर्समध्ये 28 धावा देऊन एकही विकेट घेतला नाहीत. शिवम दुबेने 4 ओव्हरमध्ये 57 धावा दिल्या. कुलदीप यादवने 2 ओव्हर्समध्ये 25 रन्स दिले. जसप्रीत बुमराह कालच्या मॅचमध्ये नव्हता. उद्या हे सर्व गोलंदाज प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार आहेत. त्यात ते अशा धावा देत असतील, तर एखाद्या सामन्यात फलंदाजी खराब झाल्यास टीम इंडियासाठी जिंकण कठीण होऊन बसेल. बुमराहला न्यूझीलंड विरुद्धच्या सीरीजमध्ये बराच मार पडला होता.