
Dombivli डोंबिवली MIDC परिसरात प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सागाव परिसरातील चेंबरमधून चॉकलेटी रंगाचा धूर बाहेर निघत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. midc

धुरामुळे आजूबाजूच्या भिंती चॉकलेटी रंगाच्या झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहेय

याआधी 14 डिसेंबर रोजी MIDC फेज–2 मध्ये केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर आल्याने रस्ता गुलाबी झाला होता. त्या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस देत कारवाईचा इशारा दिला होता.

मात्र अवघ्या पंधरा दिवसांतच पुन्हा एकदा हा गंभीर प्रकार समोर आल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हलगर्जी करणाऱ्या संबंधित कंपनीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

केमिकलयुक्त धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा धुरामुळे अनेकांच्या डोळ्यांची जळजळ होते, तसेच श्वसनाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.