Airtel Family Postpaid Plans: Airtel च्या या Postpaid Plansमध्ये Extra SIMपासून, Netflixपर्यंत मिळतात ‘हे’ खास फायदे
एअरटेलने आपल्या फॅमिली पोस्टपेड प्लॅन्समध्ये ग्राहकांसाठी अनेक खास फायदे दिले आहेत. Extra SIM, अनलिमिटेड डेटा, OTT सब्सक्रिप्शन आणि Netflix सारख्या सुविधांमुळे हे प्लॅन्स कुटुंबासाठी फायदेशीर ठरू शकतात. नेमके कोणते फायदे मिळतात आणि या प्लॅन्समध्ये काय खास आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

भारती एअरटेलने अलीकडेच आपल्या पोस्टपेड प्लॅन्सच्या किमतीत 50 रुपयांची वाढ केली आहे. कंपनीकडून ग्राहकांना काही प्लॅन्समध्ये इंटरनॅशनल रोमिंगसह अतिरिक्त सिमची सुविधाही दिली जात आहे. यामुळे एका पोस्टपेड कनेक्शनअंतर्गत कुटुंबातील अनेक सदस्यांचे मोबाइल नंबर मॅनेज करता येतात.
एअरटेलच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅन्सची सुरुवात 749 रुपयांच्या प्लॅनपासून होते. या प्लॅनमध्ये मुख्य नंबरसोबत एका अतिरिक्त सिमचा पर्याय मिळतो, त्यामुळे दोन सदस्यांसाठी हा उपयोगी ठरू शकतो. यामध्ये अनलिमिटेड 4G/5G डेटा, कॉलिंग आणि दररोज 100 SMSची सुविधा दिली जाते.
कुटुंबातील सदस्य जास्त असतील तर 1,049 रुपयांचा एअरटेल पोस्टपेड प्लॅन पर्याय ठरू शकतो. या प्लॅनमध्ये मुख्य सिमसोबत दोन अतिरिक्त सिम जोडता येतात आणि कॉलिंग-डेटाची सुविधा मिळते. याशिवाय Apple iCloud+, Apple Music, Amazon Prime, JioHotstar, Xstream Play Premium आणि Google One सारखे फायदे मिळतात.
चार सदस्यांचे कुटुंब असल्यास 1,249 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन अधिक सोयीचा ठरू शकतो. या प्लॅनमध्ये प्रायमरी नंबरसोबत तीन अतिरिक्त सिम जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे. या प्लॅनचे सबस्क्रिप्शन आणि इतर प्रमुख फायदे 1,049 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच आहेत.
मनोरंजनासाठी Netflix देखील हवे असल्यास एअरटेलचा 1,449 रुपयांचा फॅमिली पोस्टपेड प्लॅन विचारात घेता येईल. यामध्ये तीन अतिरिक्त सिमसह आधीच्या प्लॅनमधील अनेक फायदे मिळतात आणि Netflix Basicचा समावेश आहे. एकाच बिलातून कुटुंबातील अनेक नंबर मॅनेज करण्याची सुविधा असल्याने मोठ्या कुटुंबांसाठी हे प्लॅन्स उपयुक्त ठरू शकतात.