
जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया या भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम आहेत. या कंपन्या नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आणि भन्नाट अशा ऑफर घेऊन येतात. विशेष म्हणजे या आकर्षक ऑफर्सचा आजघडीला कोट्यवधी ग्राहक लाभ घेतात.

यात तीन कंपन्याच्या अशा काही भन्नाट ऑफर्स आहेत, ज्यांची फारच कमी लोकांना कल्पना आहे. या तीन कंपन्या 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत जिओ हॉटस्ट्रारचे सबस्क्रिप्शन देतात. विशेष म्हणजे हे सबस्क्रिप्शन तुम्हाला 90 पेक्षा जास्त दिवस मिळते.

जिओचा एक 195 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 90 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 15 जीबी डेटा मिळतो. तसेच 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचे (मोबाईल, टीव्ही) सबस्क्रिप्शन मिळते.

व्होडाफोन आयडियाचा तर यापेक्षा कमी किमतीचा एक प्लॅन आहे. हा प्लॅन फक्त 100 रुपयांचा असून त्याची व्हॅलिडिटी 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 5 जीबी डेटा मिळतो. तसेच 1 महिन्यासाठी जिओ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळते.

व्होडाफोन आयडियाचा आणखी एक 151 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनअंतर्गत तुम्हाला 3 महिन्यांसाठी जिओ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळते. या प्लॅनची व्हॅलिडिटी 90 दिवस असते. तर तुम्हाला या प्लॅनमध्ये 4 जीबी डेटा मिळतो.