वॉचमनच्या तोंडून आलेल्या त्या 4 शब्दावरून बनलं सुपरहिट गाणं, 28 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आजही लोक गुनगुनतात
वॉचमनच्या तोंडातून निघालेल्या या चार शब्दावरून 28 वर्षांपूर्वी अजय देवगणच्या चित्रपटात तयार करण्यात आलेलं गाणं. ठरलं प्रचंड ब्लॉकबस्टर. आजही प्रत्येक नवरा बायको बाहेर जाताना गुनगुनतो.

भारतीय चित्रपटसृष्टीबद्दल एक गोष्ट नेहमीच सांगितली जाते ती म्हणजे गाणी नसतील तर चित्रपटाची मजा अपुरी वाटते. भारतात तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये गाण्यांना विशेष स्थान असते आणि ही गाणी देशाबाहेरही तितकीच लोकप्रिय ठरतात.

अनेक गाण्यांच्या मागे काहीतरी वेगळी आणि रंजक कथा दडलेली असते. अशीच एक खास गोष्ट म्हणजे Akele Na Bazaar Jaya Karo या गाण्याची. हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

या गाण्याची कल्पना कशी सुचली याबद्दल प्रसिद्ध संगीतकार आणि गीतकार आनंद राज आनंद यांनी एक मनोरंजक किस्सा सांगितला होता. त्यांनी शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये हा अनुभव शेअर केला.

आनंद राज आनंद यांनी सांगितले की, एकदा ते काही लोकांच्या गप्पा ऐकत होते. त्यावेळी एका वॉचमनने बजारिया में सबकी नजरिया खराब असे वाक्य उच्चारले. हे वाक्य त्यांच्या मनात इतके घर करून राहिले की त्यावरून गाणे तयार करण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. या साध्या वाक्यानेच पुढे एका सुपरहिट गाण्याचा जन्म झाला.

यानंतर त्यांनी अकेली ना बाजार जाया करो हे गाणे लिहिले आणि त्याला संगीतही दिले. या गाण्याला आवाज दिला होता प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी. चित्रपटात हे गाणे अजय देवगण आणि सोनाली बेंद्रे यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली आणि गाणे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले.