PHOTO | अजित पवार बांधावर, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं आश्वासन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती, पंढरपूरमध्ये जाऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

| Updated on: Oct 18, 2020 | 1:55 AM
गेल्या तीन-चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पाऊस कमी होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा सुरु केला आहे.

1 / 8
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बारामती, पंढरपूरमध्ये  जाऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

2 / 8
यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. या पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

3 / 8
पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली, कासेगांव येथील गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त पिकांची तसंच पुरग्रस्त भागांची पाहणी त्यांनी केली. यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सरसकट पिकांचे पंचनामे करावेत, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

4 / 8
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधून नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचं सांगितलं.

5 / 8
अतिवृष्टीमुळे तसेच भीमा नदीला पूर आल्यामुळे अनेक नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटलेला असतो, यासाठी आवश्यक तिथे पूल बांधणी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

6 / 8
महापुरामुळे नदीकाठचे वीज रोहित्रे, वीजेचे पोल पाण्यात वाहून गेल्यामुळे नदी काठच्या गावांची वीज खंडीत झाली आहे. महावितरण कंपनीनं तत्काळ अधिकचे कर्मचारी उपलब्ध करुन वीजपुरवठा पुर्ववत करावा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

7 / 8
पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची आणि चंद्रभागा नदीवरील कुंभारघाट येथेही उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.