‘या’ मराठी अभिनेत्रीसोबत परश्याचा रोमान्स; दोघांना एकत्र पाहून नेटकरी म्हणाले, ‘बच्चू …’

‘सैराट’ फेम आकाश ठोसर पुन्हा चर्चेत आला आहे. एका मराठी अभिनेत्रीसोबतचा त्याचा रोमँटिक अंदाज पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या. नेमकी कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घ्या…

| Updated on: Oct 09, 2026 | 5:49 PM
1 / 5
‘सैराट’ या गाजलेल्या सिनेमातून ‘परश्या’च्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता आकाश ठोसर सध्या मोठ्या पडद्यावर फारसा दिसत नाही. त्यामुळे आकाश सध्या नेमकं काय करतोय, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

‘सैराट’ या गाजलेल्या सिनेमातून ‘परश्या’च्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता आकाश ठोसर सध्या मोठ्या पडद्यावर फारसा दिसत नाही. त्यामुळे आकाश सध्या नेमकं काय करतोय, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

2 / 5

आकाश ठोसरची ‘सैराट’साठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी निवड केली होती. छोट्या गावातून आलेल्या आकाशला अभिनयासोबतच कुस्तीचीही आवड आहे. ‘सैराट’नंतर त्याने काही चित्रपटांमध्ये काम केलं, मात्र त्यांना ‘सैराट’सारखं यश मिळालं नाही.

3 / 5

2017 मध्ये आकाश ‘एफयू: फ्रेंडशिप अनलिमिटेड’ या सिनेमात दिसला होता. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात आकाशसोबत वैदेही परशुरामी, सत्या मांजरेकर, संस्कृती बालगुडे आणि मयुरेश पेम यांच्या भूमिका होत्या. या सिनेमात आकाश आणि वैदेहीची जोडी पाहायला मिळाली होती.

4 / 5

‘एफयू’मधील आकाश आणि वैदेहीच्या रोमँटिक सीन्सची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. त्यांच्या एका गाण्यातील डान्सवरही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. वैदेही समोर बच्चू दिसतोय अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या होत्या. विशेष म्हणजे, वैदेही आकाशपेक्षा वयाने एका वर्षाने मोठी आहे.

5 / 5

दरम्यान, आकाश ठोसरच्या ‘बाल शिवाजी’ या सिनेमाची काही वर्षांपूर्वी घोषणा झाली होती. या चित्रपटासाठी तो तयारी करत असल्याचंही समोर आलं होतं. मात्र त्यानंतर या सिनेमाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. ‘सैराट’शिवाय आकाशने ‘झुंड’, ‘लस्ट स्टोरीज’ आणि ‘घर, बंदूक, बिर्यानी’ यांसारख्या प्रोजेक्ट्समध्येही काम केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us