
2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रभु देवाचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'राउडी राठोड' मध्ये अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमात सानिया अंकलेसरियासह अनेक बाल कलाकारही होते.

'राउडी राठोड' या सिनेमात अभिनेता यशपाल शर्माने इन्स्पेक्टर विशाल शर्माची भूमिका निभावली होती आणि सानिया अंकलेसरियाने त्याच्या मुलीची भूमिका केली होती. तिने साकारलेल्या भूमिकेला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

30 सप्टेंबर 2002 रोजी मुंबईत जन्मलेल्या सानिया अंकलेसरियाने मुंबईतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून कंप्यूटर इंजीनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. सध्या ती मुंबईत वेब डेव्हलपर म्हणून काम करते आणि नृत्य आणि अभिनयाचाही अभ्यास करते.

सानिया हिने फक्त 'रावडी राठोड' सिनेमातच नाही तर, 'रांझणा', 'लाइफ्ट गुड', 'बॉम्बरिया', 'आतंकवादी अंकल' यांसारख्या सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. आजही तिने साकारलेल्या भूमिका चाहत्यांच्या लक्षात आहेत.

सानिया अंकलेसरिया इंस्टाग्रामवर फारशी सक्रिय नसते. तिची शेवटची पोस्ट जुलैमध्ये होती. तिचे सुमारे 9 हजार फॉलोअर्स आहेत.