Akshaye Khanna: मलबार हिल ते अलिबाग.. अक्षय खन्नाची कोट्यवधींची संपत्ती, आलिशान घरं अन् लक्झरी कार्स
Akshaye Khanna: अभिनेता अक्षय खन्नाने नुकतंच मलबार हिल परिसरात कोट्यवधींचा अपार्टमेंट खरेदी केला आहे. या खरेदीमुळे अक्षय खन्नाच्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओची आणि संपत्तीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Akshaye Khanna property: अभिनेता अक्षय खन्ना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. ‘धुरंधर’मधील रहमान डकैतच्या भूमिकेनंतर त्याच्या अभिनयाची जोरदार चर्चा झाली आणि आता त्याच्या महागड्या प्रॉपर्टीच्या खरेदीनेही लक्ष वेधून घेतलं आहे. अक्षय खन्नाने मुंबईतील पॉश मलबार हिल परिसरात तब्बल 33.26 कोटी रुपयांचा आलिशान अपार्टमेंट खरेदी केला आहे.
अक्षय खन्नाचं मुंबईतील जुहूमध्येही आलिशान घर आहे. समुद्राचं दृश्य, मोकळी बाल्कनी, भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि खासगी होम थिएटर अशा सुविधा या घरात आहेत.
मुंबईच्या धावपळीपासून दूर अक्षय खन्नाचं अलिबागशीही जुनं नातं आहे. 2009 मधील रिपोर्ट्सनुसार त्याने अलिबागमध्ये बंगला खरेदी केला होता. अलिबागचं हे ठिकाण शांतता, हिरवाई आणि प्रायव्हसीसाठी ओळखलं जातं. त्याच्या या घरात वास्तुशांती आणि गृहप्रवेशाची पूजाही झाली होती.
अक्षय खन्नाची एकूण संपत्ती तब्बल 167 कोटी रुपये असल्याचं कळतंय. त्याची संपत्ती चित्रपटांमधील कमाई, गुंतवणूक आणि रिअल इस्टेट यातून कमावलेली आहे.
अक्षय खन्नाचा स्वभाव नेहमीच लो-प्रोफाइल राहिला आहे. अक्षयकडे बीएमडब्ल्यू 7 सीरिज आणि टोयोटा फॉर्च्युनरसारख्या गाड्या असल्याचं समोर आलं आहे.
अक्षय खन्ना नेहमीच प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहिला आहे. मात्र, मलबार हिलमधील 33.26 कोटींची नवी प्रॉपर्टी, जुहूचं घर, अलिबागमधील ठिकाण आणि लक्झरी कार्स पाहता त्याची ऑफ-स्क्रीन लाइफही तितकीच रॉयल असल्याचं दिसतं.