
'धुरंधर' या मल्टीस्टारर फिल्मचा सगळीकडेच बोलबाला असून सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ते रेहमान डकैत बनलेल्या अक्षय खन्नाचीच. त्याची स्टाईल, त्याच स्वॅग, त्याचा अभिनय.. सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा आहे. सोशल मीडियातही रणवीर सिंग नाही तर अक्षय खन्नाचेच ट्रेंड्सवर वर्चस्व आहे. धुरंधर पार्ट 1 हा फक्त अ7यचाच आहे, असं अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. रणवीर सिंग, आर माधवन, संजय दत्त सारख्या स्टार्समध्येही अक्षय खन्नाच्या जबरदस्त अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र एखाद्या खलनायकाने चित्रपटाच्या नायकाला मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक चित्रपटांमध्ये खलनायकांनी प्रसिद्धी मिळवली आहे. चला जाणून घेऊया इंडस्ट्रीतील अशा खलनायकांबद्दल... (Photos : Social Media)

बॉबी देओल - 2023 मध्ये आलेल्या ॲनिमल चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर कम्माल केली होती. या चित्रपटात जरी रणबीर कपूर हा नायक असला तरी, ॲनिमलमध्ये मूक खलनायक बॉबी देओल याचीच सोशल मीडियावर चर्चा होती. त्याच्या दमदार अभिनयासोबतच, "जमाल कुडू" या गाण्यातील त्याच्या एंट्रीमुळे खूप चर्चा झाली. त्या गाण्यावर अनेक रील्सही बनले. ॲनिमलमध्ये अबरारची भूमिका बॉबी देओलच्या कारकिर्दीतील माईलस्टोन ठरली. तो इंटरनेट सेन्सेशन बनला, रणबीरपेक्षाही जास्त चर्चा त्याचीच झाली.

शोले - 'शोले' या कल्ट क्लासिक चित्रपटात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या, परंतु गब्बर सिंगची भूमिका साकारणाऱ्या अमजद खाननेच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. अमजद खान यांनी साकारलेली गब्बरची भूमिका आजही चित्रपट रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित खलनायकांपैकी एक मानले जाते.

जयदीप अहलावत - फॅमिली मॅन मालिकेच्या तिसऱ्या भागात जयदीप अहलावतने प्रवेश केला. त्याने रुक्माच्या भूमिकेतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारली. मनोज वाजपेयी त्याच्या भूमिकेत हिट झाले, त्यांचा अभिनय नेहमीच दमदार होता. पण खलनायकाच्या भूमिकेत जयदीप अहलावतने त्याचा अस्सल अभिनय दाखवत मनोज वाजपेयालाही मागे टाकलं.

रितेश देशमुख - रितेश देशमुखने 'रेड २' या चित्रपटात निगेटीव्ह भूमिका केली. खरंतर त्याने यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये ग्रे शेड असलेल्या भूमिका केल्या आहेत. पण 'रेड २' मध्ये त्याने थेट अजय देवगणला क्कर दिली, इंटरनेटवर त्याच्याच कामाची चर्चा होती.

अमरीश पुरी - एव्हरग्रीन अशा 'मिस्टर इंडिया' चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांनी खलनायक मोगॅम्बोची भूमिका केली होती. अनिल कपूर हा चित्रपटाचा नायक होता. पण आजही जेव्हा जेव्हा 'मिस्टर इंडिया' चित्रपटाचा उल्लेख केला जातो तेव्हा सर्वांच्या तोंडी पहिले मोगॅम्बोचे नाव येतं. अमरीश पुरी यानी हीी भूमिका इतकी दमदार केली होती की भारतीय सिनेमासृष्टीतील आयकॉनिक व्हिलनच्या यादीत खूप वरच्या स्थानी आहेत.

पद्मावत - दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांच्या चित्रपटात रणवीर सिंगने नकारात्मक भूमिका साकारली होती. त्याने अलाउद्दीन खिलजीची भूमिका केली होती. रणवीरचे ट्रान्सफॉर्मेशन, त्याचा स्वॅगर, त्याची संवाद डिलिव्हरी आणि त्याचा क्रूर स्वभाव हे सर्व हिट झाले. शाहिदपेक्षाही तो जास्त प्रभावी ठरल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं.