Alka Kubal: अलका कुबल यांच्या लेकीचा थाटात साखरपुढा, कोण आहे होणारा जावई? अभिनेत्रीने शेअर केले फोटो

अलका कुबल यांनी लेकीच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत दिलेल्या शुभेच्छांमुळे चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. मराठी कलाकारांसह अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट करत कस्तुरी आणि संकेत यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

| Updated on: Nov 22, 2026 | 8:56 AM
1 / 6
Alka Kubal: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. अलका कुबल यांची मुलगी कस्तुरी अठल्ये हिचा साखरपुडा पार पडला आहे. या खास सोहळ्याचे काही सुंदर फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यानंतर चाहत्यांकडून कस्तुरीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लेकीच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणी अलका कुबल आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद या फोटोंमधून पाहायला मिळत आहे.

Alka Kubal: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. अलका कुबल यांची मुलगी कस्तुरी अठल्ये हिचा साखरपुडा पार पडला आहे. या खास सोहळ्याचे काही सुंदर फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यानंतर चाहत्यांकडून कस्तुरीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लेकीच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणी अलका कुबल आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद या फोटोंमधून पाहायला मिळत आहे.

2 / 6

मिळालेल्या माहितीनुसार, कस्तुरी आठल्ये आणि संकेत दुधाळ यांचा साखरपुडा 15 नोव्हेंबर 2026 रोजी पार पडला. मोजके कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी खास फुलांची सजावट करण्यात आली होती. ऑफ व्हाइट रंगाच्या फुलांनी सजवलेला परिसर आणि पारंपरिक पद्धतीने केलेली सजावट यामुळे कार्यक्रमाला सुंदर रूप आलं होतं.

3 / 6

साखरपुड्याच्या दिवशी कस्तुरीने लाल रंगाची सुंदर सिल्क साडी नेसली होती. गळ्यात पारंपरिक हार, कमरपट्टा आणि नाकात नथ असा तिचा पारंपरिक लूक लक्षवेधी ठरला. तर रिसेप्शनच्या वेळी तिने राखाडी रंगाची डिझायनर साडी परिधान केली होती. तिच्या या दोन्ही लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

4 / 6

अलका कुबल यांच्या लेकीच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना तिच्या होणाऱ्या पतीबद्दलही उत्सुकता लागली आहे. कस्तुरीचा साखरपुडा संकेत दुधाळ यांच्याशी झाला आहे. मात्र संकेत यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि व्यवसायाबद्दल फारशी माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

5 / 6

अलका कुबल आणि त्यांचे पती समीर आठल्ये यांना दोन मुली आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही मुलींनी आई-वडिलांच्या मनोरंजन क्षेत्रातील पावलावर पाऊल न ठेवता आपापल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवलं आहे. त्यांची मोठी मुलगी ईशानी आठल्ये ही व्यावसायिक वैमानिक आहे. 2022 मध्ये तिचा दिल्लीतील निशांत वालिया यांच्याशी विवाह झाला.

6 / 6

तर धाकटी मुलगी कस्तुरीने वैद्यकीय क्षेत्राची निवड केली. तिने फिलिपिन्समधून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं आहे. भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली एफएमजीई परीक्षा तिने पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली. तिला त्वचारोगतज्ज्ञ म्हणून करिअर घडवायचं असल्याची माहितीही समोर आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us