
अनेकदा डॉक्टर आपल्याला ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला देतात. ड्रायफ्रुट्स हे केवळ चवीला उत्तम नसतात, तर ते पोषक तत्वांनीही परिपूर्ण असतात. शरीराला ऊर्जा देण्यापासून ते मेंदू तंदुरुस्त ठेवण्यापर्यंत ड्रायफ्रूट्सची आपल्याला मदत होते.

काजू, बदाम, पिस्ता, मणुका, आक्रोड यांसह इतर अनेक ड्रायफ्रूटस आपण खात असतो. पण कोणत्या ड्रायफ्रूटमध्ये व्हिटॅमिन, मॅग्नेशियम आणि फायबर हे कशात जास्त असते, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

डायटिशियन अनामिका गौर यांच्या मते, बदाममध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी २, मॅग्नेशियम आणि फायबरचा उत्तम स्रोत आहेत. विशेषत यात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते.

बदामात असलेल्या व्हिटॅमिन ई मुळे त्वचेला पोषण मिळते. तसेच कोरडेपणा दूर होतो. वृद्धत्वाची लक्षणे देखील दिसत नाही. दररोज ५-६ बदाम खाल्ल्याने त्वचा उजळते आणि निरोगी दिसते.

बदामाला 'ब्रेन फूड' असेही म्हटले जाते. यात असलेले रायबोफ्लेविन (Riboflavin) आणि एल-कॅर्निटाइन (L-Carnitine) मेंदूची कार्यक्षमता वाढवतात. स्मरणशक्ती तल्लख करतात.

बदामामध्ये निरोगी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या स्वच्छ होतात आणि हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

बदामातील व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स केसांच्या मुळांना मजबूत करतात. यामुळे केस गळणे कमी होते, कोंडा नियंत्रित होतो. केसांना नैसर्गिक चमक येते.

बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि झिंक (Zinc) असतात. हे घटक रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. ज्यामुळे विविध आजार आणि संक्रमणांपासून शरीराचे संरक्षण होते.