
अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. सुहाना 'द अर्जिस' सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे. पण अद्याप प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करु शकलेली नाही.

किंग खानची लेक तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत नसली तरी, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. शाहरुखची लेक सुहाना आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर घरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिग बींची लेक श्वेता नंदाला देखील सुहाना फार आवडते. श्वेताने देखील सुहाना आणि अगस्त्य यांच्या नात्याला दुजोरा दिला होता. आता सुहाना हिच्या पोस्टवर श्वेता हिने प्रतिक्रिया दिली आहे.

'सुहाना माझी पार्टनर आहे..' असं अगस्त्य नंदा म्हणाला होता. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखली करण्यात आलं. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.

सुहाना हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सुहाना लवकरच 'किंग' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सुहाना पहिल्यांदा वडील शाहरुख खान याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.