
बॉलिवूडमधील खलनायक म्हणून अमरीश पुरी ओळखले जातात. त्यांची दहशत कित्येक वर्ष पाहायला मिळाली. पण तुम्हाला माहिती आहे का अमरीश पुरींनी सर्वांसमोर स्मिता पाटीलच्या कानशिलात लगावली होती. आता नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...

अमरीश पुरी यांनी एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला होता. आता त्यांच्या या मुलाखतीचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते सिनेमातील एका सीनविषयी बोलत आहेत. या सीनमध्ये त्यांना स्मिता पाटीलला अमरीश पुरी यांच्यावर रागावून निघून जायचे असते.

'सीन करण्यापूर्वी मला दिग्दर्शकाने विचारले की तू रिअलमध्ये स्मिता पाटीलच्या कानशिलात लगावू शतो का? असे बोलून दिग्दर्शक शांत झाले. त्यांना वाटले यामुळे समस्या निर्माण होईल. जर स्मिताला चुकून थप्पड जोरात लागली तर की शूट सोडून निधून जाईल. पण शेवटी दिग्दर्शक तयार झाले अन् सीन शुटिंगची वेळ आली' असे अमरीश पुरी म्हणाले.

स्मिता पाटीलला काहीच माहिती नव्हते. ती सीनसाठी उभी राहिली. अचानक अमरीश पुरींनी कानशिलात लगावल्यामुळे ती चिडली.

सीन संपल्यानंतर स्मिता पाटील अमरीशपुरी यांच्या मागे बदला घेण्यासाठी पळत होत्या. सेटवरील सर्वजण ते पाहून हसत होते.