
देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा राधिका मर्चंटसोबत लवकरच विवाह होणार आहे. 1 मार्च पासून जामनगर, गुजरातमध्ये प्री-वेडिंग फंक्शन्स होणार असून त्यापूर्वी अन्नदान समारंभ पार पडला. (photo : social media)

अन्नदान समारंभात भावी वर-वधू, अनंत आणि राधिका या दोघांनी उपस्थितांना स्वत:च्या हाताने जेवण वाढलं.

अन्नसेवाचा हा कार्यक्रम प्री-वेडिंग फंक्शन सुरू होईपर्यंत चालेल. त्याअंतर्गत 51,000 लोकांना जेवण देण्यात येईल.

अन्नसेवा समारंभादरम्यान मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या तिघांनी उपस्थितांना स्वत:च्या हाताने जेवण वाढलं.

यावेळी राधिका गुलाबी रंगाच्या हेवी ड्रेसमध्ये दिसली. ऑरेंज दुपट्टा आणि हेवी ज्वेलरीसह तिने हा लूक पूर्ण केला.

तर अनंत अंबानी यावेळी लाल रंगाचा कुर्ता, जॅकेट घालून दिसला. दोघांचीही जोडी सुंदर दिसत होती.

या समारंभात मुकेश अंबानीही उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमातील उपस्थितांशी संवाद साधला, त्यांना आग्रह करून, हसतमुखाने जेवणही वाढलं.