
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न आज पार पडतंय. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

आज अनंत अंबानी आणि राधिका सात फेरे घेणार आहेत. आता अनन्या पांडे ही पिवळ्या रंगाचा लेहेंगा घालून लग्नात पोहोचली आहे. यावेळी अनन्या पांडे हिच्या लेहेंग्यावर मागच्या बाजूने 'अनंत ब्रिगेड' लिहिले आहे.

संजय कपूरची मुलगी शनाया कपूर जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसली. शनाया कपूर हिच्या लेहेंग्यावर देखील अनंत ब्रिगेड लिहिले आहे.

अर्जुन कपूर हा देखील अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नात पोहोचलाय. यावेळी अर्जुन कपूर याने लिहिले की, 'मेरे यार की शादी है.' गोल्डन रंगाची शेरवानी अभिनेत्याने घातली.

सारा अली खान ही देखील आपल्या भावासोबत या लग्नात पोहोचली आहे. शिखर पहाडिया याचेही फोटो व्हायरल होत आहेत. शिखरही या लग्नात पोहोचला आहे.