
अनाया बांगर ही केल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सर्जरी करुन मुलापासून मुलगी बनलेल्या अनायाचे वडील माजी क्रिकेटपटू संजय बांगर आहेत. अनाया सतत तिच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. नुकताच ती एका रिअॅलिटी शोमध्ये सहगाभी झाली आहे. त्यामध्ये तिने धक्कादायक खुलासा केला आहे.

अनाया सध्या Amazon MX Playerवर सुरु असलेल्या 'Rise And Fall' या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. या शोमधील तिचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

या शोमध्ये तिने सांगितले की सर्जरीनंतर एका प्रसिद्ध क्रिकेटपटूने तिला अश्लील फोटो पाठवला होता आणि या क्रिकेटपटूला सर्वजण ओळखतात.

'गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मी सर्वजनिक प्लॅटफॉर्मवर सर्वांसमोर आले. डिसेंबर-जानेवारीमध्ये सोशल मीडियावर माझ्या मनात येईल ते पोस्ट करत होते' असे अनाया म्हणाली.

पुढे ती म्हणाली, 'अचानक एका क्रिकेटरने मला अॅड केले आणि आमच्यामध्ये काही संवाद झाला नव्हता. तिने थेट त्याचा फोटो पाठवला. तसा फोटो पाठवला होता.'

तिच्या शेजारी बसलेल्या इतरांनी तिला विचारले की तो फोटो अश्लील होता का? त्यावर अनायाने 'आता समजून जा' असे उत्तर दिले.

दुसऱ्या स्पर्धकाने तिला विचारले का फोटो पाठवणाऱ्याला तू ओळखते का? त्यावर अनायाने 'त्याला सर्वजण ओळखतात' असे स्पष्ट म्हटले.

सध्या अनायाचे 'Rise And Fall' हा शोमधील अनेक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकजण तिच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.