
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर या कंपनीने बाजारात कमाल केली आहे. हा शेअर 5 वर्षात हा शेअर 3400 टक्क्यांनी वधारला. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला.

रिलायन्स पॉवरचा शेअर कमी कालावधीत 1.13 हून थेट 39 रुपयांवर पोहचला. कंपनीचा शेअर 52 आठवड्यातील उच्चांकावर 54.25 रुपयांवर पोहचला. तर निच्चांकी कामगिरी 19.37 रुपयांवर आहे.

सध्या रिलायन्स पॉवरचे मार्केट कॅप 16,000 कोटी रुपयांवर पोहचले आहे. गेल्या 4 वर्षात अनिल अंबानी यांच्या कंपनीचा शेअर 1102 टक्के वधारला आहे.

आता या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरमध्ये 3100 टक्क्यांची तेजी दिसून आली. 25 फेब्रुवारी 2025 रोजी हा शेअर 36.46 रुपयांवर बंद झाला.

रिलायन्स पॉवरचा शेअर गेल्या 2 वर्षात 239 टक्क्यांनी वधारला. गेल्यावर्षी 3 फेब्रुवारी रोजी हा शेअर 11.75 रुपयांवर होता. तर या 4 फेब्रुवारी हा शेअर 39.91 रुपयांवर बंद झाला.

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या