Knowledge : पृथ्वीवरचा असा जीव जो कधीच मरत नाही, या अजब चमत्काराबद्दल माहिती आहे का?

गॅलपोगास कासव हा साधारण दोनशे ते अडीचशे वर्षांपर्यंत जिंवत राहू शकतो. 2006 साली अद्वैत नावाच्या एका कासवाचा 225 व्या वर्षी मृत्यू झाला होता.

| Updated on: Oct 13, 2025 | 12:39 AM
1 / 6
पृथ्वीवर काही अचंबित करणाऱ्या गोष्टी आहेत. पृथ्वीवर असलेली जीवसृष्टी तर रहस्यांनी तसेच आश्चर्याने भरलेली आहे. याच पृथ्वीवर काही जीव तर अमर असल्याचे म्हटले जाते. तर काही प्राणी हे कित्येक दशकांपर्यंत जिवंत असतात असे म्हटले जाते.

2 / 6
आर्क्टिक समुद्रात राहणारा बोहेड व्हेल मासा हा साधारण 200 वर्षांपर्यंत जगतो, असे म्हटले जाते. बोहेड व्हेल जातीशी मिळतीजुळती असलेली मिंक व्हेल ही माशाची जात 60 वर्षांपर्यंत जगू शकते.

3 / 6
गॅलपोगास कासव हा साधारण दोनशे ते अडीचशे वर्षांपर्यंत जिंवत राहू शकतो. 2006 साली अद्वैत नावाच्या एका कासवाचा 225 व्या वर्षी मृत्यू झाला होता.

गॅलपोगास कासव हा साधारण दोनशे ते अडीचशे वर्षांपर्यंत जिंवत राहू शकतो. 2006 साली अद्वैत नावाच्या एका कासवाचा 225 व्या वर्षी मृत्यू झाला होता.

4 / 6
कोई कॉर्फ मासा हा आकाराने छोटा असतो. याला पाळीव मासा म्हणून ओळखले जाते. या माशाचे वय 200 वर्षांपेक्षा जास्त असते. आर्क्टिक महासागरात आढळणारा ग्रीनलँड शार्क हा मासादेखील 200 वर्षांपेक्षा अधिक काळ जगू शकतो.

5 / 6
अंटार्क्टिक महासागरात आढळणारा अंटार्क्टिक स्पंज त्याच्या वयामुळे ओळखला जातो. 5000 ते 15000 वर्षापर्यंत अंटार्क्टिक स्पंज जिंवत राहतो. तुर्रिटोप्सिस डोहर्नी ही एक जेलिफिशची प्रजात आहे. या प्रजातीला तर पृथ्वीवरील अमर प्राणी म्हटले जाते.

6 / 6
या जेलिफिशला डोकं आणि हृदय नसते. हा जेलिफिश कधीच म्हातारा होत नाही. एक निश्चित वय झाल्यानंतर जेलिफिश पुन्हा एकदा तरुण होते.