
अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता ही इंडस्ट्रीमधील आवडतं जोडपं आहे. जोडप्यांमधील संबंध, कधीकधी फिटनेस गोलमुळे दोघंही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असतात. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका नवीन फोटोशूटमध्ये मिलिंद आणि अंकिता लिपलॉक करताना दिसत आहेत.

मिलिंदने हा फोटो शेअर केला असताना अंकिताने त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

मिलिंद सोमण यांनी तो फोटो शेअर करताना लिहिले- 'वेगन फॅशन- भाग 2' ... व्हिडीओ शेअर करताना अंकितानं लिहिलं- 'नवी मोहीम !!!' व्हिडीओसोबत तिने असेही सांगितले आहे की त्यांचे शाकाहारी फॅशन फोटोशूट पेटा (पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स) इंडियाचे आहे.

तसं तर हे दोघं नेहमीच बोल्ड अंदाजात चाहत्यांशी केक्ट होताना दिलतात. मात्र आता या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलात व्हायरल होतोय.

मिलिंद सोमण यांनी 2018 मध्ये आपल्यापेक्षा 25 वर्ष लहान असलेल्या अंकिताशी लग्न गाठ बांधली होती.