Ankita Lokhande : कोळसा व्यापाऱ्याची पत्नी अंकिता लोखंडेचा शाही थाट, 8 BHK फ्लॅट, कोट्यवधींचा फार्महाऊस अन्…, फोटो पाहून डोळे विस्फारतील

Ankita Lokhande : एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने खासगी आयुष्यात अनेक चढ - उतारांचा सामना केला. पण आता अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. अंकिता हिने कोळसा उद्योजक विकी जैन याच्याशी लग्न केलं. आज अंकिता नवऱ्यासोबत आलिशान आयुष्य जगत आहे.

| Updated on: Nov 22, 2026 | 8:44 AM
1 / 6
अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन टीव्ही विश्वातील लोकप्रिय कपल आहे. 'बिग बॉस'मध्ये देखील दोघांनी  स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन टीव्ही विश्वातील लोकप्रिय कपल आहे. 'बिग बॉस'मध्ये देखील दोघांनी स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

2 / 6

अंकिता एक उत्तम अभिनेत्री आहे, हे सर्वांनाच नाहिती आहे. तर विकी कोळसा व्यापारी आहे. विकी गडगंज श्रीमंत देखील आहे. अंकिता आज नवऱ्यासोबत आलिशान आयुष्य जगत आहे.

3 / 6

अंकिता हिचं सासर छत्तीसगड येथील बिलासपूर येथे आहे.. अभिनेत्रीच्या एका जुन्या युट्यूब व्लॉगमध्ये आलिशान सासरच्या घराची झलक दिसत आहे. अत्यंत आलिशान आणि रॉयल असं अंकिता हिचं घर आहे.

4 / 6

फोटोमध्ये विक्कीचं विशाल फार्महाऊस, इंटरनॅशनल स्कूल आणि डेंटल कॉलेज देखील दिसत आहे. यूट्यूब व्हिडिओमध्ये अंकिता आणि विक्कीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या फार्महाऊसची सफर घडवली

5 / 6

फार्महाऊसमध्ये ऑर्गेनिक भाज्या आणि फळे पिकवतात. चिकू, डाळिंब, ब्रोकोली, शेवग्याच्या शेंगा आणि दुधी भोपळा यांसह फार्महाऊसमध्ये जवळपास सर्वच गोष्टी पिकवल्या जातात. अंकिताने असंही सांगितलं की त्यांच्याकडे एक गोशाळा देखील आहे.

6 / 6

विक्की जैन आणि अंकिता लोखंडे मुंबईत एका आलिशान 8-BHK अपार्टमेंटमध्ये राहतात. याशिवाय त्यांचे मुंबईत आणखी एक 3-BHK अपार्टमेंट देखील आहे. अंकिता अनेकदा घराचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us