
प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरात सध्या सनई-चौघडे वाजत आहेत. कारण त्यांची मुलगी आलिया कश्यप लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या काही काळापासून ती शेन ग्रेगॉइरला डेट करतेय.

गेल्या वर्षी जून महिन्यात आलियाने शेन ग्रेगॉइरशी साखरपुडा केला होता. आलिया आणि शेनच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. नुकताच या दोघांचा हळदी समारंभ पार पडला.

आलिया आणि शेनच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हळदीत आलिया आणि शेनचा रोमँटिक अंदाजही पाहायला मिळाला. दोघांनी लिपलॉक करत एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला.

आलियाची अत्यंत खास मैत्रीण आणि अभिनेत्री खुशी कपूरसुद्धा बॉयफ्रेंड वेदांग रैनासोबत या हळदीच्या कार्यक्रमाला पोहोचली होती. अनुराग कश्यपची मुलगी आलिया ही 23 वर्षांची असून येत्या 11 डिसेंबर रोजी ही लग्नबंधनात अडकणार आहे.

आलिया आणि शेन लग्नापूर्वीच लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. वयाच्या 22 वर्षी लग्नबंधनात अडकण्याच्या आलियाच्या निर्णयाची काहींनी खिल्ली उडवली होती. त्यावर तिने दिलेलं उत्तरही चर्चेत आलं होतं.

“हे माझं आयुष्य आहे. साखरपुडा, लग्न या गोष्टींसाठी मी आता पूर्णपणे तयार आहे. किंबहुना आम्ही दोघं तयार आहोत. सहा महिन्यांपासून शेन आणि मी एकत्र राहतोय आणि गेल्या तीन वर्षांपासून आम्ही एकमेकांना डेट करतोय. एखाद्या व्यक्तीबाबत तुम्हाला खात्री असते, तेव्हा तुम्ही निर्णय घेण्यात विलंब करत नाही”, असं ती म्हणाली होती.