वर्षाचा बंपर क्लायमॅक्स; ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत मोठा ट्विस्ट

प्रेम, जिद्द, आणि कौटुंबिक ऐक्याची गोष्ट सांगणारी 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील हा अत्यंत भावनिक आणि तितकाच रंजक भाग प्रेक्षकांना संध्याकाळी 6.30 वाजता झी मराठीवर पाहता येईल.

| Updated on: Dec 26, 2024 | 10:30 AM
1 / 5
'झी मराठी' वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. प्रेम, जिद्द आणि कुटुंब यातून सध्या ही मालिका जात आहे. जिथे अप्पी आणि अर्जुनच्या लग्नाचा दिवशी नाट्यमय घडामोडी घडताना दिसतात.

'झी मराठी' वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. प्रेम, जिद्द आणि कुटुंब यातून सध्या ही मालिका जात आहे. जिथे अप्पी आणि अर्जुनच्या लग्नाचा दिवशी नाट्यमय घडामोडी घडताना दिसतात.

2 / 5

पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकण्याची तयारी करत असताना या दोघांना पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागतो. अमोलची गंभीर शस्त्रक्रिया होत असताना ते अमोलच्या सोबत राहण्याचा निर्धार करतात.

3 / 5

हॉस्पिटलमध्ये जात असताना संकल्प समोर आल्याने संकल्पचे भयानक मनसुबे उघडकीस येतात. त्याने अमोलच्या वैद्यकीय अहवालात फेरफार करून त्याच्या जीवाला धोका निर्माण केला आहे.

4 / 5

या तीव्र संघर्षात अर्जुन निश्चित करतो की संकल्पला कायद्याच्या कचाट्यात अडकवायचं. या गोंधळाच्या वातावरणात अप्पी आणि अर्जुनचे लग्न आणि अमोलची शस्त्रक्रिया एकाच वेळी सुरू आहे.

5 / 5

मात्र, त्यांच्या लग्नाच्याच वेळी अमोलच्या हृदयाचा ठोका थांबतो. एका हृदयस्पर्शी क्षणात चमत्कारच घडतो, जो अमोलला बरं करतो आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदात आहे. या हृदयस्पर्शी वळणानंतर अमोल नवविवाहित अप्पी आणि अर्जुनसाठी भव्य गृहप्रवेशाचा समारंभ आयोजित करतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us