
वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या बनले आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केली जातात. मात्र, तरीही वजन काही कमी होत नाही. अशावेळी काही गोष्टी फॉलो करणे आवश्यक आहे.

नवीन वर्षाच्या सुरूवातीला बरेच लोक वाढलेले वजन कमी करण्याचे ठरवतात. जर तुम्ही देखील तसे काही ठरवले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

तुम्ही रिकाम्या पोटी अॅपलच्या व्हिनेगरचे पाणी पिऊ शकता. हे पेय शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते आणि इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते.

हे प्यायल्याने चरबीच्या चयापचय क्रियेतही मदत होते. ज्यामुळे वजन झटपट कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे रिकाम्या पोटी हे पिल्याने अधिक फायदा होतो.

अॅपलच्या व्हिनेगरमुळे त्वचाही सुंदर होण्यास मदत होते. केसांसाठीही अॅपलच्या व्हिनेगर फायदेशीर ठरते. बरेच लोक केसांना अॅपलच्या व्हिनेगर लावतात.