
दिवाळीचा सण सुरू झाला असून या काळात सुंदर फोटो निघावेत आणि आपण सुंदर दिसावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. जर तुम्हालाही सुंदर त्वचा हवी असेल तर मस्त फेसपॅक तयार करा आणि चेहऱ्याला लावा.

एका भांड्यात काही मनुके घाला आणि ते बारीक होईपर्यंत कुस्करून घ्या. नंतर, बदाम पावडर घाला केशर, दूध आणि मध मिक्स करून घ्या.

यानंतर ही पेस्ट लगेचच आपल्या चेहऱ्याला लावा. साधारणपणे वीस मिनिटे हा पॅक आपल्या चेहऱ्यावर ठेवा. यादरम्यान आपण काकडी कट करून डोळ्यावर ठेऊ शकता.

फेसपॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवा. चेहरा न पुसता चेहऱ्यावरील पाणी कोरडे होऊ द्या. त्यानंतर चेहऱ्यावर गुलाब जल लावा आणि तसेच ठेवा.

हा फेसपॅक लावल्यानंतर तुम्हाला त्वचेमध्ये मोठा बदल जाणवेल. या फेसपॅकमुळे आपली त्वचा मुलायम होण्यास मदत होते. हा पॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.