शूटिंगच्या वेळी या अभिनेत्रीवर झालेला बलात्काराचा प्रयत्न, घाबरून सोडली इंडस्ट्री, आज सौंदर्याने लावतेय सर्वांना वेड

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री, जिच्यावर शूटिंग संपल्यानंतर झालेला बलात्काराचा प्रयत्न. घाबरलेल्या अभिनेत्री थेट इंडस्ट्रीच सोडली. कोण आहे ती अभिनेत्री?

| Updated on: May 16, 2026 | 1:12 PM
1 / 6
हिंदी, मराठी आणि इतर भाषांतील चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेत्री अर्चना जोगळेकर या एकेकाळी त्यांच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे प्रचंड चर्चेत होत्या. 1980 च्या दशकात करिअरची सुरुवात करणाऱ्या अर्चना यांनी चित्रपटांसोबतच दूरदर्शन मालिकांमध्येही काम केले.

2 / 6
त्यांनी फार मोठ्या प्रमाणात काम केले नसले तरी त्यांच्या अभिनयशैलीने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र एका धक्कादायक घटनेनंतर त्यांनी अचानक चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम ठोकला.

3 / 6
अर्चना जोगळेकर यांनी 1985 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मराठी चित्रपट ‘खिचडी’मधून त्यांनी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर काम केले. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी, हिंदी तसेच इतर भाषांतील चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये भूमिका साकारल्या. त्यांच्या सुंदर डोळ्यांची आणि निरागस चेहऱ्याची त्या काळात मोठी चर्चा होत असे.

4 / 6
1997 मध्ये अर्चना जोगळेकर ‘स्त्री’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी भुवनेश्वर येथे गेल्या होत्या. याच काळात त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. शूटिंगदरम्यान त्या राहत असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये एका स्थानिक व्यक्तीने त्यांच्या खोलीत घुसून त्यांच्यावर हल्ला केला आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती.

5 / 6
या घटनेनंतर अर्चना जोगळेकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आणि तब्बल 13 वर्षे या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अखेर 2010 मध्ये न्यायालयाने आरोपीला 18 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. मात्र या संपूर्ण प्रकाराचा अर्चना यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला आणि त्यांनी हळूहळू चित्रपटसृष्टीपासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला.

6 / 6
या घटनेनंतर अर्चना जोगळेकर यांनी अभिनय क्षेत्रातून जवळपास पूर्णपणे दूर जाण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. सध्या त्या अमेरिकेत राहतात आणि तिथे स्वतःची डान्स अकॅडमी चालवतात.

Follow Us