
बॉलिबुडचा बादशाहा शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला आता वेगळ्या ओळखीची गरज नाही. बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेबसिरीजचे दिग्दर्शन करून आपण काय करू शकतो, हे आर्यनने दाखवून दिले आहे. याच आर्यन खानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले.

यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. पलक तिवारी आणि आर्यन खान अनेकदा एकत्र दिसलेले आहेत. विशेष म्हणज अनेक कार्यक्रमांत त्यांनी एकत्र हजेरी लावलेली आहे.

त्यामुळेच पलक तिवारी ही आर्यन खानची रुमर्ड गर्लफ्रेंड असल्याचे बोलले जाते. दरम्यान, याच पालक तिवारीचे काही फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. तिने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर हे फोटो पोस्ट केले आहेत.

पलक तिवारी सध्या फिरायला ऑस्ट्रेलियामध्ये गेली आहे. ऑस्ट्रेलियात ती आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याच ट्रिपदरम्यान तिने बिकिनीवर काही फोटोशुट केले आहे. हेच फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

तिच्या या फोटोंना लाखोंनी लाईक्स आहेत. पलक तिवारीने प्रिंटेड बिकिनी परिधान करून हे फोटो काढले आहेत. काही फोटोंमध्ये तिच्या डोक्यवर हेल्मेट दिसत आहे. हेल्मेट घालून ती प्रवासाचाही आनंद लुटताना दिसत आहे. पलक तिवारी लवकरच मोठ्या चित्रपटांत अभिनेत्री म्हणून झळकणार आहे.