या अभिनेत्रीने तिच्याच काकासोबत चित्रपटात केला रोमान्स, चित्रपटात घेण्यासाठी निर्मात्यांची लागायची लाईन, घेयची सर्वात जास्त मानधन

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिने आपल्याच काकासोबत चित्रपटामध्ये केला रोमान्स. तिला चित्रपटात घेण्यासाठी घराबाहेर लागायची निर्मात्यांची लाईन. पुरुष अभिनेत्यांपेक्षा जास्त घेयची मानधन.

| Updated on: Feb 21, 2026 | 11:22 AM
1 / 6
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाची चर्चा झाली की अभिनेत्री आशा पारेख यांचे नाव आदराने घेतले जाते. 1960 आणि 70 च्या दशकात चित्रपटसृष्टी प्रामुख्याने पुरुष कलाकारांभोवती फिरत असताना आशा पारेख यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाची चर्चा झाली की अभिनेत्री आशा पारेख यांचे नाव आदराने घेतले जाते. 1960 आणि 70 च्या दशकात चित्रपटसृष्टी प्रामुख्याने पुरुष कलाकारांभोवती फिरत असताना आशा पारेख यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

2 / 6

केवळ अभिनय नाही तर नृत्यकौशल्य, व्यक्तिमत्त्व आणि बॉक्स ऑफिसवरील यशाच्या जोरावर त्या त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक ठरल्या. 1959 साली प्रदर्शित झालेल्या 'दिल दे के देखो' या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. चित्रपटाच्या यशानंतर त्या रातोरात स्टार बनल्या.

3 / 6

यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अनेक चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाने त्यांना इंडस्ट्रीतील अव्वल अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवून दिले. त्या काळात निर्माते-दिग्दर्शक त्यांना आपल्या चित्रपटासाठी साइन करण्यासाठी रांगा लावत असत.

4 / 6

आशा पारेख यांना मिळणारे मानधन अनेक नामांकित पुरुष अभिनेत्यांपेक्षाही जास्त होते. स्त्रियांना दुय्यम स्थान दिल्या जाणाऱ्या त्या काळात ही मोठी गोष्ट होती. त्यांनी आपल्या कष्ट आणि गुणवत्तेच्या जोरावर हे स्थान मिळवले.

5 / 6

त्यांचे व्यावसायिक आयुष्य यशस्वी असले तरी वैयक्तिक आयुष्यात त्यांनी विवाह केला नाही. एका मुलाखतीत त्यांनी कबूल केले होते की त्यांना निर्माता नासिर हुसैन यांच्याबद्दल प्रेमभावना होत्या. मात्र, ते आधीच विवाहित होते. कोणाचे घर उद्ध्वस्त करून स्वतःचे नाते निर्माण करायचे नाही असा निर्णय घेत त्यांनी अविवाहित राहणे पसंत केले.

6 / 6

तसेच अरबाज खानच्या ‘द इनविंसिबल्स सीरीज’ या कार्यक्रमात त्यांनी एक किस्सा सांगितला होता. महाबळेश्वर येथे शूटिंगदरम्यान निर्माता ओम प्रकाश यांनी गंमतीने आशा पारेख आणि शम्मी कपूर यांचे लग्न झाले असल्याची अफवा पसरवली होती. नंतर शम्मी कपूर यांनीच ही केवळ मस्करी असल्याचे स्पष्ट केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us